अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त; तपासा आजचे भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला फार महत्त्व असते. या दिवशी बहुतांश लोक सोने खरेदी करतात. या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि घरात समृद्धी येते, असे म्हटले जाते. या पाश्वभूमीवर सोने आणि चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान तसेच लग्नसराईचा काळ सुरु असल्याने गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत होते. गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,790 रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर 1 किलो चांदीचा दर 63,500 रूपयांवर व्यवहार करत आहे. चांदीचा दरही गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी आहे.

जळगावातील सराफ व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार आज जळगावातील सोन्याचे भाव 52530 रुपये आणि चांदीचे भाव 65788 रुपये आहेत. तसेच औरंगाबादमधील सोन्याचे भाव 52779 रुपये आणि चांदीचे भाव 66271 आहे. तर नाशिकमधील सोन्याचे भाव 52755 रुपये आणि चांदीचे भाव 66186 रुपये आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.