धक्कादायक; सासऱ्याने केला सूनेचा आणि ५ वर्षीय नातवाचा खून…

0

 

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धाकादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सासऱ्यानेच आपली सून व नातवाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खुनामागील कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात घडली आहे. प्राथमिक माहितीनूसार घरात कुणीही नसताना सासऱ्याने सुनेवर आणि पाच वर्षीय नातवावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती कळताच संग्रापूर पोलिसांनी घटनास्थऴी धाव घेतली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.