अयोध्येला रामाचे दर्शन घ्यायला जाताय…? मग एकदा हे वाचाच

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अयोध्येतील श्री राम मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर दर्शनासाठी रामभक्तांची गर्दी झाल्याने सर्व सीमा पुन्हा सील करण्यात आल्या आहे. अयोध्येकडे कोणत्याही वाहनाला जाऊ दिले जात नाही. बांबूच्या खांबांसह ट्रॉली बॅरिअर्स लावून पोलीस कर्मचाऱ्यांसह निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. सीमा सील केल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बांबूच्या काठ्यांसह ट्रॉली बॅरिअर्स लावून पोलीस कर्मचाऱ्यांसह निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. सीमा सील केल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. येथून केवळ पासधारक, आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका, परीक्षार्थी, शेतकऱ्यांना डिझेल, पेट्रोल, दूध, भाजीपाला, गॅस सिलिंडर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने यांची तपासणी आणि खातरजमा केल्यानंतरच सोडण्यात येत आहेत.

पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला

भगवे झेंडे घेऊन येणाऱ्या वाहनांना अयोध्येत प्रवेश दिला जात नाही. अयोध्येतील भाविकांची गर्दी रोखण्यासाठी दुहेरी बंदोबस्तात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील तडकीफडकी अयोध्येत दाखल झाले आहे. अयोध्येत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दीचे योग्य नियोजन न केल्यामुळे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर नाराज आहे. त्यांनी हेलिकॉप्टरमधून राम मंदिर परिसराची पाहणी केली. सीआरपीएफकडे गर्दी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.