मोहाडी येथील शासकीय रुग्णालयातून साहित्य लांबवणाऱ्या टोळीला अटक

0

जळगावः – शहरातील मोहाडी रोडवरील शासकीय महिला रूग्णालयाच्या बांधकामाच्या ठिकाणाहून १ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून . याप्रकरणी सतबीरसिंग बलवंतसिंग टाक (वय २१), गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी (वय २२), तंजीम नसीम बेग मिर्झा (वय ३६ तिघे रा. तांबापुरा) यांच्या बुधवारी रात्रीच्या सुमारास मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरलेल्या मुद्देमालासह रिक्षा व मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

शहरातील मोहाडीरोड वरील शासकीय महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी बांधकामासाठी लागणारे साहित्य एका खोलीत ठेवण्यात आले होते. दरम्यान दि. २ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बांधकामाच्या ठिकाणाहून असलेले खोलीचे कड़ी कोयंडा तोडून आत प्रवेश करत १ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी ठेकेदार आयुष्य मणियार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सरकारी मालमत्तेची चोरी झालेली (छायाचित्र – नितीन सोनवणे। असल्या कारणामुळे या गुन्ह्याचा उघड करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते.

तांवापूरातून आवळल्या मुसक्या
पथकाला मिळालेल्या माहिती नुसार गुन्हेगार असून यातील सदबिरसिंग याच्यावर तब्बल घरफोडीचे १९ गुन्हे, गुरजितसिंग याच्यावर ११ तर तंजीम बेग मिर्झा याच्यावर ३ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. हे तिघे सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.तिघे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चोरी करणारे तिघे चोरटे है सराईत टाक, गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी व तंजीम नसीम बेग मिझां या तिघांना तांबापूरातून अटक केली, त्यांच्याकडून ९७ हजार रुपये किमतीचे साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि रिक्षा जप्त करण्यात आले

या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, पोलीस नाईक, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, किरण पाटील, छगन तायडे, ललित नारखेडे आणि साईनाथ मुंडे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.