नितीन गडकरींना महाविकास आघाडीमधून खासदार करण्याचे उद्धव ठाकरेंचे आश्वासन

0

धाराशिव ;- भाजपकडून लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, ज्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने चर्चेला उधाण आले आहेत. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. सोबतच महाविकास आघाडीमधून खासदार करण्याचे आश्वासन देखील ठाकरेंनी दिले आहे.

“दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची” अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे. उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये सभा झाली तेव्हा ते बोलत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.