भुसावळात द लिगर प्रॅक्टीशनर्स डिस्ट्रिक्ट बार असोशिएशनची स्थापना

0

भुसावळ ;- वकील बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी येथील ज्येष्ठ वकिलांनी एकत्र येत द लिगर प्रॅक्टीशनर्स डिस्क्टि बार असोशिएशनची स्थापना केली आहे. या बार असोशिएशनची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली असून त्यांच्यातर्फे बार असोशिएशनला प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

बार असोशिएशनच्या माध्यमातून वकील बंधू-भगिणींना येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर काम करण्यात येणार आहे. समाजाचे हित जोपसण्यासाठी या बार असोशिएशनची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या 15 वर्षांपासून वकिलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अन्य संघटनांमध्ये केवळ निवडणुका होतात प्रत्यक्ष समस्या सोडविण्यावर कुणीही काम करीत नसल्याने ज्येष्ठ वकिलांनी पुढे येत या असोशिएशनची स्थापना केली आहे.

प्रत्येक सदस्याला एक वर्षासाठी अध्यक्षपद देण्यात येणार असून प्रत्येकाला संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असोशिएशनमध्ये अध्यक्ष म्हणून ॲड. सुशिल बर्गे, उपाध्यक्ष ॲड. योगेश बाविस्कर, सचिव ॲड. नितीन खरे, सहसचिव योगेश दलाल, ॲड. वैशाली चौधरी, कोषाध्यक्ष ॲड. राजेश शर्मा, उपकोषाध्यक्ष शरद तायडे, ग्रंथपाल मुकेश चौधरी, सदस्य गौतम साळुंखे, सचिन कोष्टी, ॲड. अभिजित मेढे, ॲड. शेख इसार यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.