इंग्रजीच्या पेपरला चोपडा तालुक्यात २ विद्यार्थ्यांवर कारवाई

0

चोपडा ;- इंग्रजीचा पेपर असल्याने सर्वच केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला होता. तरीही काही परीक्षा केंद्रांवर भरारी पथकाची नजर चुकवून कॉप्याचा पाऊस पडला. दरम्यान, चोपडा तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रावर डाएटच्या भरारी पथकाने पाहणी करुन दोन विद्यार्थ्यांवर डिबारची कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळ, नाशिकच्या वतीने माध्यमिक शालांत परीक्षा दि.१ मार्चपासून सुरु झाल्या असून दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. दरम्यान, दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने सकाळी १० ते साडेदहा वाजेपासून केंद्र परिसरात विद्यार्थ्यांसह पालकांनी हजेरी लावली होती. मुलांचे परीक्षा हॉल व बेंच शोधण्यासाठी काही पालकाच्या कसरत सुरु होती होती.

१ हजार ९० विद्यार्थी अनुपस्थित दहावीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यात १४३ परीक्षा केंद्रात ७९९ शाळांमधील एकूण ५५हजार ९४२ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ५४ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १०९० विद्यार्थी अनुपस्थित होते. जिल्ह्यात १४३ परीक्षा केंद्रांवर तहसीलदार, बीडिओ, तालुकानिहाय पथक आणि बैठे पथक यांचा परीक्षा केंद्रांभोवती करडी नजर होती. मात्र, काही ठिकाणच्या केंद्रांवर शाळांचा टक्का वाढीसाठी केंद्र चालक, शिक्षकांची मिलीजुली भगतमुळे इंग्रजीच्या पेपर शेवटच्या टप्यात कॉप्यांचा पाऊस पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.