जळगाव ;- जागतीक महीला दिनानिमित्त आज दिनांक ८ रोजी एमआयडीसी पोस्टे चा कारभार हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला काम करणा-या महीला अंमलदारांनी पाहीला. पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणुन मपोहेका निलोफर सैय्यद यांनी कामकाज पाहीले.
, तसेच मपोहेका. असताना तडवी यांनी दुय्यम अधिकारी चे कामकाज पाहीले, मपोहेका. सुनंदा तेली यांनी ठाणे अंमलदार म्हणुन काम केले व मपोका, सपला येरगुंटला यांनी सीसीटीएनएसचे कामकाज पाहीले, मपोका हसीना तडवी यांनी ऑफिस हजरचे कामकाज केले.
तसेच पोलीस स्टेशनला सफाई कर्मचारी म्हणुन काम करणारे महीला लिलाबाई म्हस्के, निर्मलाबाई तायडे, बनाबाई जाधव, व महीला अंमलदार यांचा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत जळगाव पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड , यांनी सत्कार केला.