शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे…

0

 

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी ऊसाचा दुसऱ्या हप्त्याचा मुद्दा लावून धरला आहे. ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यावरून कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवले आहेत. ऊसाचा दुसरा हप्ता १०० रुपये द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वडगाव हातकंणगले रोडवर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.

राज्य सरकार ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता न दिल्याने कारखान्यांना दुसरा हप्ता देणे अडचणीचे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शासनाने निर्णय न घेता सरकार कारखानदारांच्या पाठिशी राहिल्याने संतापलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निषेधार्थ डिजिटल बोर्ड तयार केला होता. या बोर्डावर १०० रुपयांचा दुसरा हप्ता बुडवून, एफआरपीचे (FRP) तुकडे करून शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात पेन नाही, दगड घ्यायला लावणारे सरकार, मुख्यमंत्री महोदय पोकळ वल्गना करू नका, कारखानदारांना पाठीशी घालू नका, ठरल्याप्रमाणे मागील हंगामातील दुसरा हप्ता १०० रूपये तातडीने द्या, अशा आशयाचे फलक दाखवण्यात आले आहेत.

राज्य सरकारने दोन महिन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर १०० रूपयांचा दुसरा हप्ता जमा करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: मध्यस्थी केली होती. यानंतर पुणे बेंगळुरू महामार्गावर आंदोलन स्थगित केले होते. कोल्हापुरातील ९ साखर कारखान्यांनी १०० रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.