पिंप्राळ्यात महिलेसह दोघांना मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शेजारी राहणाऱ्या तिघांनी एकाच कुटुंबातील दोन भावांसह त्यांच्या आईला जुन्या वादातून मारहाण केल्याची घटना पिंप्राळा हुडको परिसरात घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरिफ शेख असलम (वय-२३) रा. पिंप्राळा हुडको,हे मंगळवार ४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता आरिफ शेख हा घरी असताना त्यांच्या शेजारी राहणारे इकबाल शेख, युसूफ शेख आणि अल्ताफ शेख या तीन जणांनी किरकोळ कारणावरून आरिफ शेख याला मारहाण केली. तसेच त्याचा मोठा भाऊ व आई यांना देखील चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली.आरिफ शेख असलम यांनी शुक्रवार ७ एप्रिल रोजीरामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार इक्बाल शेख, व युसुफ शेख आणि अल्ताफ शेख सर्व रा. पिंप्राळा जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास महाजन पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.