पाळीव कुत्र्याला घाबरविले म्हणून एकास काठीने बदडले !

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
एका पाळीव कुत्र्याच्या जवळून दुचाकी नेऊन त्याला घाबरविल्याच्या कारणावरून कुत्र्याच्या मालकाने इतर तीन जनांसह एकाला लाकडी काठीने बेदम अमरहण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कॉलनीत राहणारे शेख सलीम शेख निजाम (वय-५२), कामाच्या निमित्ताने शुक्रवार ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जात असताना पाळीव कुत्रा घाबरून पळून गेला. या कारणावरून आशिष संजय सोनवणे व त्याच्यासोबत असलेले इतर तीन जणांनी लाकडी काठीने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेबाबत शेख सलीम शेख निजाम यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.