विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एकनाथ शिंदे- भाजप सरकारने  विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कसोटी पार केली. आता शिंदे सरकार विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना पाहायला मिळाला.

विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटाने बहुमत जिंकले. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मते मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसे पत्र देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांच्या नियुक्तीसाठी अध्यक्षांना पत्र दिले आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत चाचणीचा विश्वासदर्शक जिंकल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नवे विरोधी पक्षनेते होणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.