शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदेंना देणार पाठिंबा, भाजप खासदाराचा दावा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. दरम्यान शिंदे गटाने भाजपचा पाठींबा मिळवत सत्ता स्थापन केली. आता  शिवसेनेचे (Shivsena) 12 खासदार एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजप खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांनी तसा दावा केला आहे. सेना खासदारांच्या नाराजी बाबत खासदार तडस यांनी शिर्डीत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. शिंदे गटात खरचं खासदार जाणार का ? याची देखील चर्चा आहे. शिवसेना खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

विकासासाठी जनतेने निवडून दिले मात्र विकास न झाल्याने नाराजी आहे. नरेंद्र मोदींच्या (PM Modi) नेतृत्वात विकासाठी सेनेचे 12 खासदार पाठिंबा देतील. शिर्डीत तैलिक महासभेच्या कार्यक्रमासाठी आले असता भाजप खासदार रामदास तडस यांनी असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेतील किती आमदार शिंदे गटात सामील होणार हे पाहावे लागेल.

खा. शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा

आमदार शिंदे गटात दाखल झाल्यापासून काही खासदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. शिवसेना आणि भाजपची युती असताना हे आमदार निवडून आले आहेत. अनेक खासदारांनी जाणार असल्याचे संकेत दिल्याची माहिती देखील मिळाली आहे. काल झालेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना खासदार रामदास तडस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. तडस यांनी थेट आकडा सांगितल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.