जिल्हा परिषद उर्दु शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

“समाज सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा !” अशी धारणा असणारे जळगाव येथील ॲड. शरीफ पटेल आणि जिल्हा न्यायालयातील कार्यरत कर्मचारी  बी. जी.नाईक यांच्या आर्थिक योगदानातून जि.प.ऊर्दू कडगांव शाळेतील  इयत्ता १ ते ५ वी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॅग, लंच बॉक्स इत्यादी  शैक्षणिक साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे पाकीटे वाटप करण्यात आले.

समाज सेवेच्या स्वरूपात मोफत वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमात सरपंच ग्राम पंचायत कडगाव भारती कोळी, शा.व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक अ.रशीद मोमीन, शिक्षक शेख रेहान, अंगणवाडी सेविका आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. सदरील कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.