मोठी बातमी.. राज्यातील सत्तासंघर्षावर ‘तारीख पे तारीख’..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) पुढील सुनावणी आता सोमवारी होणार आहे. शिवसेना (Shivsena) नेमकी ठाकरेंची (Thackeray) की शिंदे (Shinde) गटाची, यासह पाच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) बुधवारी सुनावणी पूर्ण न झाल्याने उर्वरित सुनावणी आज होणार होती. पण ती सुनावणी आज झाली नाही. यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवार 8 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. आयोगानं नोटिशीबाबत वेळ वाढवून द्यावा, अशा सुप्रीम कोर्टाच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करायची की नाही या संदर्भातील निर्णय सोमवार पर्यंत घेतला जाईल, असे सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केलं आहे. कोर्टात आज झालेल्या सुनावणी दरम्यान हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करू नये, अशी मागणी ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी केली होती.  यावर आम्ही विचार करू असे कोर्टाने सांगितलं.

तसेच सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला कोणतेही आदेश न देण्याच्या सूचना आज दिल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. तोपर्यंत पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका, असे सुप्रीम कोर्टाने आयोगाला सांगितलं. दरम्यान आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना त्यांचे स्पष्टीकरण सादर करण्यासाठी आठ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.