मोठी बातमी.. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अखेर रखडलेला मंत्रीमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार उद्याच होण्याची शक्यता आहे. 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता जवळपास 10 ते 15 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल, असेही वृत्त समोर येत आहे. तर आज रात्री किंवा उद्याच हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असे संकेत शिंदे गटातील नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिले आहेत. तसेच मी मंत्रिमंडळात नसणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंचं निवासस्थान नंदनवनमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.