आचार्य सम्राट शुभचंद्र मुनी यांचे चरित्र प्रेरणादायी – पु. पार्श्वचंद्रजी म.सा.

0

प्रवचन सारांश  –  दि.  8 ऑगस्ट 2022

आचार्य सम्राट पूज्य शुभचंद्र मुनी यांचे चरित्र प्रेरणादायी असेच होते. लहानांमध्ये ते लहान, युवकांमध्ये युवक, तर वृद्धांमध्ये ते वृद्ध होत असत. त्यांच्या शेकडो गोष्टी तोंडपाठ होत्या. त्यांचे गुणवैशिष्ट्ये सांगणारी एक रचना पूज्य पार्श्वचंद्रजी म.सा.  यांनी स्वतः गायली. पू. शुभमुनी यांच्या अनेक आठवणी पार्श्वचंद्रजी म. सा. यांनी सांगितल्या. आचार्य सम्राट पूज्य शुभचंद्र म. सा. जे जयगच्छाधिपती 11 वे पट्टदर होते. त्यांची आज जन्मजयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने गुरुबंधू असलेले आचार्य सम्राट शुभचंद्र मुनी यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती आचार्यश्री प. पु. पार्श्वचंद्रजी म.सा. आदी ठाणा 7 यांच्या पवित्र सानध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यात डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पु. जयधुरंधर मुनी यांनी  प्रवचन केले. आज आचार्यसम्राट जयगच्छाधिपती 11 वे पट्टेदर पूज्य शुभचंद्रजी म. सा. यांची जन्म जयंती असल्याने त्यांनी देखील शुभचंद्र मुनी यांच्या चरित्राबद्दल प्रकाश झोत टाकला. त्यांनी सांगितले की, 17 व्या वर्षी शुभचंद्र मुनी यांची दीक्षा झाली. दिक्षेनंतर त्यांचे नाव शुभमुनी असे ठेवण्यात आले. त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. धर्माप्रती युवकांना आकर्षित करण्यासाठी ते सतत प्रेरणा देत असत. ‘सरलता, सादगी और संयम की मूर्ति थे’ शुभचंद्रमुनी यांचे या एका वाक्यात दुर्लभ असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन आपल्या प्रवचनातून केले.

2003 मध्ये त्यांना लखवा झाला होता. तरी देखील ते अनेक ठिकाणी विहार  करत, धर्मकार्य करत असत. बालक, युवक, वृद्धांसाठी दिवसातून शंभरहून अधिक वेळा मांगलिक त्यांनी दिलेली आहे. त्यांना कधीही कंटाळा करताना पाहिले नाही. ते 2015 मध्ये आचार्य पदातून स्वतः निवृत्त झाले. 12 पट्टधर म्हणून आचार्यसम्राट शुभचंद्र मुनी यांनी त्यांच्या हस्ते विद्यमान 12 वे पट्टधर म्हणून पूज्य आचार्य श्री पार्श्वचंद्रजी महाराज साहेब यांना पद प्रदान केले. आपले पद त्यांनी स्वतःच्या हाताने पुढील उत्तराधिकारीकडे सोपविणे हे वैशिष्ट्य म्हणता येईल.

डॉ. पदमचंद्रमुनी यांचे सुशिष्य जयपुरंदरमुनी यांनी ‘मेरी भावना’ या रचनेबद्दल आजच्या प्रवचनात सांगितले. ‘रहे सदा सत्संग उन्हीका ध्यान उन्हीका नित्य रहे’ या ओळींचे विश्लेषण करत असताना संगतीमुळे आपले चरित्र कसे निर्माण होते, त्याबद्दलचे महत्त्व उपस्थितांना आपल्या प्रवचनातून पटवून दिले. म्हणतात ना ‘जैसी संगत वैसी रंगत’ किंवा ‘जैसा मित्र वैसा चरित्र’ अशी म्हण प्रचलित आहे. आपण ज्ञानी, पंडित व्यक्तींच्या संगतीमध्ये रहायला हवे. ज्याप्रमाणे स्वाती नक्षत्रात शिंपल्यामध्ये एक पाण्याचा थेंब पडतो त्याचा मोती बनतो. केळीच्या पानावर तोच थेंब पडला की त्याचा कापूर बनतो. तोच थेंब सापाच्या तोंडात पडला तर त्या थेंबाचे विष बनते. कुसंगतीचा जीवनात वाईटच परिणाम होतो. सुसंगतीचा फार चांगला परिणाम आपल्या जीवनात होतो. उदाहरण देत असताना त्यांनी आंब्याच्या टोपलीमध्ये एक सडका आंबा असेल तर तो सडका आंबा अनेक चांगल्या आंब्यांना सडवून टाकतो असे सांगितले. कुसंगती ही वाईटच असते. याविषयी आपल्या प्रवचनातून सांगितले. या याशिवाय स्मरण व ध्यान कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन देखील त्यांनी केले.

—– ¤¤——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.