महाराष्ट्र व मध्यप्रदेश वन विभागात झाली संयुक्तरित्या कार्यवाही

0

 

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मध्यप्रदेश वनविभागातील वनपरिक्षेत्र धवली अंतर्गत येत असलेल्या, धामण्या ग्राम मध्ये महाराष्ट्र व मध्यप्रदेश वन विभागाने सयुंक्तरित्या कार्यवाही करीत, अवैधपणे सागवानी लाकडापासून वस्तू तसेच साग चौपट नग हे तयार केलेले, तसेच अर्धवट वस्तू मिळुन आल्या आहेत. सोबतच 2 कटर मशीनही आढळल्या आहेत. जप्त केलेला काही मुद्देमाल हा वनपरिक्षेत्र वैजापूर येथे रवाना करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, आज दि. 14/10/2022 रोजी प्रथमेश हाडपे सहाय्यक वनसंक्षक चोपडा, यावल यांना गुप्त माहितीप्राप्त झाली त्यांनी मध्यप्रदेश उपवनसंरक्षक अनुपम शर्मा व म. सहाय्यक वनसंरक्षक सुरेश अहिरवार सेंधवा यांच्याशी संपर्क साधून संयुक्त कार्यवाही केली. यावेळी त्यांच्यासोबत बी.के थोरात वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा व रेंज स्टाप वैजापूर चे आय.एस तडवी वनपाल, चुनीलाल कोळी, बाजीराव बारेला, संदीप भोई, वनरक्षक तसेच गस्तीपथक यावल येथील योगेश सोनवणे वनरक्षक, सचिन तडवी पोलीस शिपाई, आनंद तेली व निखिल पाटील वाहन चालक तसेच वन परीक्षेत्र वर्ला हे होते.

सदर प्रकरणातील जप्त साग लाकडाच्या वस्तूंबद्दल तस्करांचा कसून शोध चोपडा वैजापूर तसेच देवझीरी वनक्षेत्रातील कर्मचारी करीत आहेत. या कार्यवाहीमुळे साग तस्करांमध्ये भीतीचे वातारण तयार झाले आहे. तरी सदरची कार्यवाही ही डिगंबर पगार वनसंरक्षक धुळे, संजय पाटील विभागीय वनाधिकारी धुळे, विवेक हौसिंग उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.

असे अवैध गुन्हे तसेच घटना जर आपल्या परिसरात घडत असतील तर 1926 महाराष्ट्र वनविभाग टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून आपण माहिती देऊ शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.