‘माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय’!

जानकरांचं जाहीर भाषणात विधान

0

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरुन राष्ट्रवादी समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जानकरांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये जानकरांचे कौतुक केले. याच सभेमध्ये जानकरांनी आपण पूर्णपणे मतदारसंघातील लोकांच्या कामासाठी स्वत:ला वाहून घेतल्याचे सांगितले. आपण पूर्णवेळ उपलब्ध आहोत हे सांगताना जानकरांनी केलेले एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे.

भानगड नाय, लग्न नाय…

अजित पवारांनी महादेव जानकरांचे कौतुक करताना, सर्वसामान्य माणूस तुमचा उमेदवार आहे असे सांगितले. जानकरांचे साधेपण सांगताना, “जानकर हे गावाकडील एखाद्या खोपट्यात बसू शकतात, तेथेच झोपू शकतात आणि सकाळी तिथेच आवरुन त्यांच्या कामाला निघू शकतात. इतका हा साधा माणूस आहे. त्यामुळेच या उमेदवाराच्या पाठिशी ताकद देऊन उभे राहा,” असे आवाहन अजित पवारांनी केले. जानकरांनी आपल्या भाषणामध्ये आपण अविवाहित असून घर-दार नसल्याने पूर्णवेळ तुमच्यासाठीच उपलब्ध आहे असं आवर्जून सांगितले. “माझे कुठेही कॉलेज नाय, शाळा नाय, भानगड नाय, लग्न नाय, लफडे नाय, हा देह तुमच्यासाठीच आहे,” असे म्हणत महादेव जानकरांनी परभणीकरांना साद घातली.

Leave A Reply

Your email address will not be published.