गतिमंद मुलीवर अत्याचार ; एकाला अटक

0

भडगाव;- गतिमंद असलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवार २ एप्रिल रोजी दु भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील भडगाव तालुक्यातील एका गावात गतिमंद मुलगी ही वास्तव्याला आहे. त्याच गावात राहणारा संशयित आरोपी वाल्मीक नरसिंग पवार उर्फ जीभू याने पिडीत मुलगी गतिमंद असल्याचा फायदा घेत १ एप्रिल रोजी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही बाब पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळवार २ एप्रिल रोजी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता संशयित आरोपी वाल्मीक नरसिंग पवार यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.