ब्रेकिंग : उन्मेष पाटील नव्हे करण पवार जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे उमेदवार

0

जळगाव ;- भाजपाने जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी माहाविकास आघाडीच्या ठाकरे गटाशी संपर्क साधून या पक्षात प्रवेश केला . त्यांच्या समवेत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील शिव बंधन बांधून हाती मशाल घेतली . यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगेच माध्यमांशी संवाद साधतांना महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे करण पवार हे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार असल्याची घोषणा केली. या रणनीतीने भाजपपुढे आव्हान निर्माण केले आहे. . याप्रसंगी खासदार संजय राऊत, उन्मेष पाटील उपस्थित होते.

दरम्यान नाराज असलेले उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार राहतील अशी चर्चा असतांना पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आणि उन्मेष पाटील यांचे खंदे समर्थक करणं पवार यांना उमेदवारी घोषित झाल्याने आता भाजपचा जळगाव जिल्हा बालेकिल्ला असलेल्या जळगाव मतदार संघातून भाजपचे उमेदवार स्मिताताई वाघ यांना तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने हि लढत चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी जळगावमधून पाटील यांचे कट्टर समर्थक करण पवार यांना उमेदवारी दिली , तर कल्याणमधून महिला शिवसैनिक वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात रणरागिणी वैशाली दरेकर यांचा सामना होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कल्याण-डोंबिवलीतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघरमधून भारती कामळी यांना तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मशालीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने त्यांना तिकीट देण्यात आलं नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.