जुगार अड्डयावर छापा; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

आयजी पथकाने केली कारवाई

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा नगरपालिकेच्या मागील जागेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात 4 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकासह स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी मंगळवारी सदर कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, या छाप्यामध्ये लक्ष्मण बावीस्कर (पंचशीलनगर, चोपडा), खुशाल बावीस्कर (कोळंबा, ता. चोपडा), अजय माळी (लोहीया नगर, चोपडा), वाल्मिक शिंदे (वर्डी, ता. चोपडा), अमोल जैन (पंकजनगर, चोपडा), हिरालाल बाविस्कर (कोळंबा, ता. चोपडा), सागर पाटील (बुधगाव, ता. चोपडा), प्रवीण बावीस्कर (कोळंबा, ता.चोपडा), प्रदीप महाजन (अडावद, ता. चोपडा), अनिल लोहार (चोपडा), सुधाकर सोनवणे (गौतमनगर, चोपडा), आकाश कोळी (कुरवेल, ता. चोपडा), योगेश भोई (होळनाथे ता. शिरपूर) आदींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर काही जणांनी पलायन केले. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरु आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.