ॲड रोहिणी खडसे यांचे अभिनंदन व शुभेच्छा

0

 

लोकशाही संपादकीय लेख:

 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन ॲड रोहिणी खडसे केवलकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहिणी खडसे यांना महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शरद पवारांबरोबरच राहिले याची बक्षिस म्हणून ॲड रोहिणी खडसे यांचेवर महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीत ॲड रोहिणी खडसे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडनुक लडवली होती. त्यावेळी अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत पाठिंबा जाहीर केला होता. चुरशीच्या लढाईत भाजपच्या नाथाभाऊ विरोधातील राजकारणामुळे ॲड रोहिणी खडसे यांचा अवघ्या १८00 मतांनी पराभव झाला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसेंच्या विरोधात प्रचार केल्याने त्यांचा पराभव झाला म्हणून रोहिणीचे वडील माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तत्कालीन भाजपचे प्रदेशात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे पुराव्यानिशी अहवाल सादर केला होता. तथापि एकनाथ खडसे यांचे म्हणणे भाजपच्या नेतृत्वात ऐकले गेले नाही. याउलट भाजपतर्फे एकनाथ खडसे यांना वारंवार नामोरम करण्यात आले. शेवटी कंटाळून एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत मुक्ताईनगर बोदवड तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांची कन्या ॲड रोहिणी खडसे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी नंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष विद्या चव्हाण यांचे जागी ॲड रोहिणी खडसे यांची निवड करून शरद पवार यांनी त्यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपवली आहे. एका राजकीय पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांच्या निवडीने जळगाव जिल्ह्यासाठी जणू बहुमान मिळाला आहे.

 

ॲड रोहिणी खडसे यांना राजकारणाचे धडे त्यांचे पिता एकनाथ खडसे यांच्याकडून मिळाले आहेत. अगदी तरुण वयातच रोहिणींवर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदाची धुरा सोपवण्यात आली. जिल्हा बँकेला डबघाईच्या गर्देतून बाहेर काढून नफ्यात आणण्याचे श्रेया चेअरमन ॲड रोहिणी खडसे यांना जाते. त्यांच्या पाच वर्षाच्या चेअरमन पदाच्या कारकिर्दीत बँकेचा संपूर्ण व्यवहार शेतकऱ्यांचे हिताचे संरक्षण करून अत्यंत काटकसरीने केला आणि बँकेला मोठ्या एनपीडीतून मुक्त केले. महाराष्ट्रातील अनेक जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती डबघाईस आली असताना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मात्र डबघाईतून बाहेर काढण्याचे श्रेय चेअरमन म्हणून ॲड रोहिणी खडसेंना तसेच त्यांच्या सहकारी संचालकांना द्यावे लागेल. त्यांचे वडील एकनाथ खडसे यांचा अनेक वर्षांच्या राज्यकारभार कारभाराचा अनुभव ॲड रोहिणी खडसे यांना मिळाला आणि त्यांचे पासूनच राजकारणात ॲड रोहिणी खडसे यांचे नेतृत्व गुण आत्मसात केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवने खचून न जाता संपूर्ण मुक्ताईनगर आणि बोदवड तालुका पिंजून काढला. रोहिणीच्या पराभवाला भाजपातील गटबाजी कारणीभूत असल्याचे सर्वच मान्य करतात. त्या ऐवजी रोहिणीच्या विरोधात राजकीय भूमिका घेणारे शरद पवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांचे पाठीशी उभी केली होती. तरीसुद्धा चंद्रकांत पाटील फक्त १८०० मताने विजयी झाले होते. आता योगायोग असा की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना देऊन त्यांचा एक प्रकारे सन्मान केला आहे. राज्यस्तरावर महिलांचे नेतृत्व करून महिलांची संघटना पक्षात बळकट करण्याची जबाबदारी आता रोहिणींवर सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात रोहिणी खडसे ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील अशा शुभेच्छा. तसेच राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ॲड रोहिणी खडसे यांना मिळाली. जळगाव जिल्ह्याचा हा बहुमान म्हणून म्हणता येईल. त्याबद्दल रोहिणी खडसे यांचे अभिनंदन आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.