Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»मोठी बातमी.. देशात आजपासून ‘हे’ मोठे बदल, थेट खिशावर परिणाम
    आरोग्य

    मोठी बातमी.. देशात आजपासून ‘हे’ मोठे बदल, थेट खिशावर परिणाम

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    देशातील सर्व नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. आज 1 सप्टेंबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार असून या काही नियमांमुळे तुमचं आर्थिक बजेट कोलमडण्याचीही शक्यता आहे. जाणून घेऊयात आजपासून कोणते बदल होणार आहेत.

     

    एलपीजी सिलेंडरचे दर 

    दर महिन्याच्या पहिल्या दिवशी देशातील तेल आणि गॅस वितरण कंपन्या दरांमध्ये बदल करतात. आज देखील या किमतींमध्ये बदल करण्यात आले आहे. दरम्यान  दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने  एलपीजी सिलेंडरचे कमी केले होते.  केंद्र सरकारने 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी केले आहे.

     

    आयपीओसाठी T+3 नियम 

    सेबीने आयपीओ (Initial Public Offering) संदर्भात देखील नियम आणले आहेत. आयपीओ  बंद झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या स्टॉक्सची लिस्टिंग होण्याची वेळ मर्यादा अर्ध्यापर्यंत म्हणजेच, तीन दिवसांपर्यंत केली आहे. यापूर्वी ही वेळ मर्यादा सहा दिवसांची होती. लिस्टिंगच्या या नव्या नियमामुळे आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्यांसोबतच इन्वेस्टमेंट करणाऱ्यांनाही फायदा होणार आहे. सेबीने यासंदर्भात यापूर्वीच अधिसूचना जारी केली आहे. आपल्या अधिसूचनेत सेबीनं म्हटलं आहे की, 1 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर येणार्या सर्व आयपीओसाठी लिस्टिंगच्या वेळेचे नवीन नियम स्वेच्छेने लागू केले जातील. तसेच, 1 डिसेंबर 2023 पासून, कंपन्यांना नियमांचं पालन अनिवार्यपणे करावं लागेल. सेबीने 28 जून रोजी झालेल्या बैठकीत T+3 नियमाला मान्यता दिली होती.

     

    ‘या’ क्रेडिट कार्डचे नियम 

    अॅक्सिस बँकेचे मॅग्नस क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची असणार आहे. सप्टेंबरच्या एक तारखेपासून या क्रेडीट कार्डाच्या अटी आणि शर्तींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. बँकेच्या वेबसाईटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून ग्राहक काही व्यवहारांवर विशेष सवलतींचा लाभ घेऊ शकणार नाहीत. एवढंच नाही तर या क्रेडिट कार्डशी संबंधित आणखी एक धक्कादायक बदल पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे 1 सप्टेंबरपासून नवीन कार्डधारकांना वार्षिक शुल्कही भरावं लागणार आहे, याची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.

     

    आधार अपडेट 

    जर तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट करायचं असेल तर तुमच्याकडे ते अपडेट करण्याची शेवटची संधी आहे. UIDAI नं आधार अपडेटची सुविधा मोफत दिली आहे. त्याची मुदत 14 सप्टेंबर रोजी संपत आहे. यापूर्वी ही सुविधा 14 जूनपर्यंत होती. त्यानंतर तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. तुम्हीही अद्याप आधार अपडेट केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार अपडेट करुन घ्या.

     

    सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँक बंद 

    सप्टेंबरमध्ये  तब्बल 16 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. RBI ने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि कार्यक्रमांनुसार या बँक सुट्ट्या बदलू शकतात. यामध्ये रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. एकीकडे कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे सण पुढील महिन्यात 2023 च्या सप्टेंबरमध्ये येत आहेत, तर दुसरीकडे 3, 9, 10, 17, 23 आणि 24 सप्टेंबरला रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यामुळे बँकांमध्ये कामकाज होणार नाही.

     

     

     

     

    1st September 2023: Axis Bank Credit Card Rules Axis Bank Magnus Credit Card LPG Cylinder Prices Rule Change From 1st September 2023: SEBI T+3 Rule for IPOs
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी

    August 12, 2026

    वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!

    August 12, 2026

    आम्हाला शाहांचे भाषण ऐकण्यात काहीच स्वारस्य नाही

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif