जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला स्टेटस, वाळू माफियांचा तिसरा डोळा…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यावर ठेवली जातेय पाळत...

0

 

लोकशाही विशेष

 

जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची जणू काही दहशत पसरली आहे. जिल्ह्यातील गिरणा आणि तापी या मुख्य नद्यांमधून अवैध वाळूचा उपसा दिवसेंदिवस वाढतच आहे. या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरला अडवून त्यांच्यावर कारवाई केली तर अधिकाऱ्यांवर पाळत ठेवत हल्ले करण्याची घटना सध्या जिल्ह्यात घडत आहेत. इतकेच काय तर आता थेट जिल्हाधिकाऱ्यांवर पाळत ठेवली जात आहे.

काही महिन्यांपूर्वीच जळगाव जिल्हाधिकारी पदी आयुष प्रसाद यांची नेमणूक करण्यात आलीय. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि विशेष म्हणजे वाळू माफिया यांचा नायनाट करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. जेव्हापासून त्यांनी जळगाव जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली आहे तेव्हापासून वाळू माफियांवर कारवाई करून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, यामुळे मात्र वाळू माफिया आणि त्यांच्यावर वरदहस्त असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान पोलीस विभागाकडून ५२ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत गजाआड करण्यात आले आहे. यात वाळू माफियांचा देखील समावेश आहे. त्यातच आज सोशल मीडियावर जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवलेला स्टेटस चर्चेचा विषय बनला आहे. जिल्हाधिकारी पदाच्या जबाबदारीसह त्यांच्याकडे अनेक गोपनीय खात्यांचे देखील काम असते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे तरसोद ते पाळधी या महामार्गाने प्रवास करत असताना चक्क त्यांच्या वाहनामागे ५-६ दुचाकी पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. महत्वाचे म्हणजे हे दुचाकीवरील लोकं वाळू माफियांचे पंटर होते. यावरून लक्षात येते जिल्हाधिकारी देखील सुरक्षित नसून त्यांची गोपनियता देखील धोक्यात आली आहे.

 

 

 

” I always thought that I would be a celebrity one day and paparazzi would follow me. People are following me, but my officers say that they are linked to ‘Sand Mafia’ ”

(मला नेहमी वाटायचे की मी एक दिवस सेलिब्रिटी होईन आणि पॅपराझी मला फॉलो करतील. लोक माझा पाठलाग करत आहेत, पण माझे अधिकारी म्हणतात की ते ‘वाळू माफियां’शी संबंधित आहेत) असा स्टेटस जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर ठेवला आहे.

शहानिशा करण्यासाठी लोकशाही ची टीम जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थाना जवळ पोहोचली असता. त्यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या अजिंठा विश्राम गृह जवळ असलेल्या पाणी पुरीच्या गाडीचा आधार घेत वाळूमाफियांचा गुर्गा प्रत्यक्षरीत्या आढळून आला. स्टिंग करत आमच्या प्रतिनिधीने व्हिडिओ घेतला. याच पोस्ट मध्ये सोबत हा व्हिडिओ आहेच. वाळू तस्करी करणाऱ्या माफियांची इतकी हिम्मत नक्की कश्यामुळे वाढत आहे? यामुळे खरच जिल्हाधिकारी सुरक्षित आहेत का? हा सवाल समोर येणे स्वाभाविक आहे. नाशिक येथील उप-जिल्हाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतांना पुन्हा तशीच काही कृती इथेही वाळूमाफिया करू पाहत आहेत का? गुन्हेगारांवर पोलीस प्रशासन, गृहखाते वचक ठेवण्यास अपयशी ठरते आहे का? जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत इतका ढिसाळपणा नक्की का? असा प्रश्न जनमानसात उपस्थित होत आहे.

स्टिंग व्हिडीओ…

 

काही दिवसांपूर्वीच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोपडा येथील प्रांताधिकार्‍यांच्या गाडीला अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने धडक देऊन कारचे नुकसान केले. त्यात प्रांताधिकारी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. वाळू माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक कायद्यांची गरज आहे. असाच काही बाका प्रसंग आता जिल्हाधिकाऱ्यांवर ओढवलेला दिसतो. या वाळू माफियांना कायदा आणि अधिकाऱ्यांचे भय राहिले नाहीये का ? दिवसेंदिवस यांची हिम्मत कशी काय वाढत आहे. ही नामुष्की म्हणता येईल का ?

Leave A Reply

Your email address will not be published.