ही आमदारांची कार्यक्षमता की अकार्यक्षमता?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय सावकार यांनी परवा विधानसभा अधिवेशनात भुसावळ बस स्थानकाचे दुर्दशेसंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. त्यात चार मुद्दे उपस्थित केले होते. त्यात भुसावळ बस स्थानकातील संपूर्ण काँक्रिटीकरण रखडले आहे, त्यासाठी प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. त्याचे कॉंक्रिटीकरण कर केव्हा केले जाईल? तसेच भुसावळ बस स्थानकाची रंगरंगोटी खराब झाली आहे. त्याची रंगरंगोटी केव्हा केली जाईल? भुसावळ बस पोर्ट करण्याची घोषणा फडणवीस सरकारच्या काळात केली होती, त्याचे काय झाले? तसेच भुसावळला नवीन पत्त्यावत बस स्थानकाची जागा मंजूर झालेली असून तिथे नवीन बस स्थानक केव्हा बांधले जाईल? आणि भुसावळसाठी इलेक्ट्रॉनिक बसेस दिले जातील काय? असे बरेच प्रश्न परिवहन मंत्र्यांना विचारण्यात आले होते. त्याला उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले काँक्रिटीकरणासाठी सव्वा दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव करण्यात आला असून बाकी रंगरंगोटी, इलेक्ट्रॉनिक बसेस आणि नवीन बस स्थानक बांधकामा संदर्भात अर्थसंकल्पाच्या तरतूद केल्या जातील. असे गोलमाल उत्तर देऊन दादा भूसेंनी आमदार सावकारांच्या प्रश्नांची बोळवण केली. विधानसभा अधिवेशनात आपल्या मतदारसंघातील समस्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून वाचा फोडली म्हणून आमदार सावकार यांनी आपली पाठ थोपटून घेतली असली, तरी भुसावळ मतदार संघातील आमदार मतदार यांच्या या कृतीने समाधानी नाही. कारण आमदार संजय सावकारे हे गेल्या पंधरा वर्षापासून भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यापैकी महाविकास आघाडीची अडीच वर्षे वगळले तर बाकी सर्व काळात ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. त्यापैकी अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. त्यानंतर 2014 च्या विधान निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या आशीर्वादाने भाजपतर्फे आमदार संजय सावकारे यांनी निवडणूक लढवली आणि मोदी लाटे ते निवडूनही आले. कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला असला तरी लोकसभा लोकसेवा करण्यासाठी तो झेंडा खांद्यावर घेतला म्हणून तत्वाशी तडजोड केली असे सांगून मते मिळवत ते विजय झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पाच वर्षे राज्यात होते. त्या सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय सावकारे होते. त्यानंतर 2019 मध्ये भाजपतर्फे तिकीट मिळवून भुसावळ विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवर आले. पैकी अडीच वर्षात वर्षाचा कालावधी वगळता बाकी साडेबारा वर्ष त्यांनी सत्ताधारी पक्षाची आमदारकी उपभोगली आहे..

 

गेल्या पंधरा वर्षापासून भुसावळ बस स्थानकाची दुर्दशा आहे. या 15 वर्षात आमदार सावकार यांनी ठरवले असते तर भुसावळचे बस स्थानकाची दुर्दशा केव्हाच संपली असती. या कालावधीत या बस स्थानकाची सुधारणा करण्यासाठी त्यांना फार मोठा वाव होता. तसेच ते मंत्री असताना बस स्थानकाची सुधारणा करणे त्यांना काहीही अवघड नव्हते. आता निवडणूक तोंडावर असताना आपण आमदार म्हणून काहीतरी करतोय, असे दाखवून मतदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न नव्हे काय? लोकप्रतिनिधींची ही काम करण्याची कसली पद्धत? त्याला ‘कार्यक्षमता म्हणावे की अकार्यक्षमता’? असा प्रश्न उपस्थित केला गेला तर त्याला ‘अकार्यक्षमताच’ म्हणता येईल. जामनेर रोडला भुसावळ शहरासाठी अद्ययावत बस स्थानक बांधण्यासाठी जागा उपलब्ध होऊन कितीतरी वर्षे झाली. आता तेथून नवीन महामार्ग गेल्यामुळे बस स्थानकाची जागा त्यात गेल्यामुळे बस स्थानक बांधण्यासाठी जागा अपुरी पडणार आहे, असे खुद्द आमदार सावकार यांनी कबूल केले आहे. त्यामुळे अद्यावत बस स्थानक बांधकाम होईल याची निश्चितता नाही. त्यामुळे अद्ययावत बस स्थानक बांधले जाईल याची आता शाश्वती नाही. त्यासाठी रेल्वे स्टेशन जवळील बस स्थानकाची झालेली दुर्दशा दूर करणे हाच एकमेव पर्याय आहे, असे म्हणता येईल. तथापि त्यासाठी काँक्रिटीकरणासाठी जे सव्वादोन कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत त्यात फक्त एकचतुर्थांश काँक्रिटीकरण होणार, हे खुद्द आमदार सावकारे म्हणतात. त्यामुळे भुसावळ स्थानकातील रखडलेल्या त्या काँक्रिटीकरणाची आशा सुद्धा मावळली आहे, असे म्हणावे काय? राहता राहिला प्रश्न रंगरंगोटीचा.. त्यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात सांगितल्याप्रमाणे भुसावळ नगरपालिकेकडून रंगरंगोटी करण्यात आली. तथापिती रंगरंगोटी सुद्धा आता खराब झालेली आहे. राहता राहिला भुसावळच्या बसपोर्टच्या घोषणेचे. बस पोर्ट करण्याची घोषणा कधी केली. तथापि त्याच्या पाठपुराव्या अभावी ती घोषणा हवेतच विरून गेली. 20 इलेक्ट्रॉनिक बसेस देण्याच्या मागणीला मंत्री भुसे यांनी जे उत्तर दिले ते भुसावळकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. महाराष्ट्रासाठी इलेक्ट्रॉनिक बसेस खरेदीचा प्रस्ताव असून बसेस खरेदी केल्यानंतर भुसावळ वीस बसेस देण्यात येतील, असे मंत्री महोदयांनी सांगितले. सांगण्याचे तात्पर्य आपल्या आमदारकीच्या काळातील बहुसंख्य कालावधी सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा साधे भुसावळच्या बस स्थानकाची दुर्दशा दूर करण्यासाठी आमदार सावकारांना शक्य झाले नाही, ही कसली लोकप्रतिनिधींची आमदार संघातील समस्यांविषयीची आस्था? सावकारी यांच्या विधानसभेतील प्रश्न विचारण्याने मतदारसंघातील समस्या सुटणार नाही ते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ‘कार्यक्षमते’ ऐवजी ‘अकार्यक्षमतेचा’ शिक्का बसू शकतो एवढे मात्र निश्चित. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार सावकार यांना या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत…!

Leave A Reply

Your email address will not be published.