संजय राऊतांची वाईन उद्योजकांशी भागीदारी; सोमय्यांचे गंभीर आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाविकास आघाडीने राज्यातील सुपर मॉल आणि किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला आहे, तर आघाडीने मात्र त्याचं समर्थन केलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही वाईन विक्रीच्या निर्णयाचं स्वागत करताना वाईन म्हणजे दारू नसल्याचं म्हटलं होतं. राऊत यांच्या या दाव्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट राऊतांवरच हल्ला केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक आहे. वाईनचा व्यवसाय करणाऱ्या एका बड्या उद्योगासोबत संजय राऊत यांची पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच राऊतांनी आपले आरोप खोडून दाखवावेच असं आव्हानही त्यांनी दिलं आहे. सोमय्या यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात वाईन म्हणजे दारू नव्हे. मग वाईन म्हणजे काय आहे? राऊत साहेब वाईन म्हणजे काय आहे? आपला आणि वाईनचा संबंध काय? किरीट सोमय्यांचा आणि वाईनचा दमडीचाही संबंध नाही. मी आयुष्यात कधी अंडी खाल्ली नाही. बिडीही ओढली नाही. सिगारेट नाही. वाईन नाही आणि बियरही नाही. तुमचा संबंध काय आहे. संजय राऊत कुटुंबाने काही महिन्यापूर्वी वाईन व्यवसायातील मोठ्या उद्योगपतीशी बिझनेस पार्टनरशीप सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंच्या सर्व सहयोगी आणि ठाकरे सरकारचे कारनामे फक्त न् फक्त पैसे गोळा करणं आहे. महाराष्ट्राला मद्य राष्ट्र बनवायला निघाले आहेत. राऊतांनी सांगावं किती महिन्यांपूर्वी तुम्ही मॅगपी ग्रुप अशोक गर्ग यांच्या बरोबर तुम्ही बिझनेस पार्टनरशीप केली. राऊतांनी सांगावं त्यांची पत्नी आणि कन्या किती व्यवसायात ऑफिशियल पार्टनर आहे. किती व्यवसायात जॉईंट व्हेंचर केलं आहे, असं आव्हानच किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

महसूल निश्चित वाढणार पण..

ठाकरे सरकारने 28 जानेवारी 2022 रोजी सुपरमार्केट व विभिन्न दुकानांमध्ये वाईन विक्री, व्यवसायाची सूट देण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच संजय राऊत म्हणतात वाईन आणि दारूमध्ये फरक आहे. राऊत म्हणतात ते खरं आहे. महसूल निश्चित वाढणार आहे. महाराष्ट्र सरकारचा आणि राऊत परिवाराचा सुद्धा, असा टोला त्यांनी लगावला.

सोमय्यांचे आरोप

अशोक गर्ग यांची मॅगपी ग्लोबल लिमिटेड ही कंपनी 2006 मध्ये स्थापन झाली. अशोक गर्ग यांनी 12 जानेवारी 2010 रोजी मॅगपी डी एफ एस या कंपनीची स्थापना केली. या दोन्ही कंपन्यांचा मुख्य व्यवसाय हॉटेल, क्लब, पब्स आदी ठिकाणी वाईन वितरीत करण्याचा आहे.16 एप्रिल 2021 रोजी संजय राऊत परिवाराने अशोक गर्ग यांच्या मॅगपी समुहाबरोबर भागीदारीसाठी सह्या केल्या,.

विधिता संजय राऊत व पूर्वशी संजय राऊत या संजय राऊत यांच्या दोन्ही कन्या मॅगपी डी एफ एस कंपनीच्या संचालक झाल्या. अशोक गर्ग यांच्या मॅगपी समूहाचा वाईन व्यवसायाची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांची आहे. संजय राऊत यांच्या कन्या फक्त दोनच कंपन्यांमध्ये संचालक आहेत. राऊत एन्टरटेन्मेंट ( ज्या कंपन्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा काढला होता). आणि दुसरी कंपनी म्हणजे मेगपी कंपनी मेगपी कंपनचे ओरिजनल / मूळ नाव होते ‘मादक प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.