आरपीएफ जवानाला मारहाण; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात किरकोळ वादातून आरपीएफ जवानाला वाहनधारकाने दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज गिरधर मोरे (वय ३७, रा. धरणगाव जि.जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मनोज मोरे हे जळगाव येथे आरपीएफमध्ये नोकरीला आहे. शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नोकरीवरून घरी जाण्यासाठी आकाशवाणी चौकात वाहनाची वाट पाहत थांबले. त्याठिकाणी एक वाहनधारक धरणगाव येथे जात असल्याचे सांगितले. त्यानुसार ते चारचाकी वाहनात बसले.

दरम्यान वाहनधारकाने अचानक ‘धरणगाव जात नाही’, असे सांगितले. याबाबत वाहनधारकाला विचारले असता वाहनधारकाने जवळील दगड उचलून मनोज मोरे यांच्या डोक्याला मारला यात ते बेशुध्द झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

याप्रकरणी जखमी मनोज मोरे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी २९ जानेवारी रोजी अज्ञात वाहनधारकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.