पारोळा येथे बंदी असलेल्या प्लास्टिकवर कारवाई

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा शहरात नगरपरिषदेकडुन शहरात ट्रान्सपोर्टने आलेले बंदी असलेल्या प्लास्टिक वर अचानक कारवाई करण्यात आली. यात अंदाजे १०० ते १५० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले.

आज रविवार दि,३० रोजी सकाळी पारोळा नगरपरिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी ट्रान्सपोर्टचा माल उतरवला जात असताना अचानक भेट देत पाहाणी केली असता त्या ठिकाणी शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांनी बंदी असलेल्या प्लास्टिकचा माल मागवल्याचे आढळून आल्याने त्यांनी तिथेच तो माल जप्त करून कारवाई केली.

अचानक कारवाईने प्लास्टिक विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली. सदर कारवाईत शहरात ट्रान्सपोर्टने आलेले अंदाजे १०० ते १५० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

सदर कारवाईत पारोळा नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संगमित्रा संदानशिव, शहर समन्वयक रविंद्र पाटील, किशोर चौधरी, जितेंद्र चौधरी, विश्वास पाटील, आकाश कंडारे, अनिल नरवाळे यांचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.