लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष ; युवकाची ६ लाखांत फसवणूक

0

जळगाव – तालुक्यातील मोहाडी येथील तरुणाची लष्करामध्ये चालक म्हणून नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून ६ लाख १० हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी भोपाळच्या इसमासह तिघांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन सोपान गवळी (वय २३ वर्ष, रा. मोहाडी ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ते वाहन चालक म्हणून काम करतात. सुमारे पाच वर्षांपूर्वी २ मार्च २०१८ ते आतापर्यंत संशयित आरोपींनी त्यांना विश्वास संपादन करून दिशाभूल करीत फसवणूक केली आहे. लष्करामध्ये स्पोर्ट्स कोट्यातून सैन्य दलात भरती करून देतो असे आमिष त्यांना दाखवले होते. त्यानुसार वेळोवेळी त्यांच्याकडून ८ लाख १० हजार रुपये घेतले.

त्यातून २ लाख रुपये परत देखील दिले. मात्र उर्वरित रक्कम आजपर्यंत दिली नाही. तसेच नोकरी देखील अर्जुन गवळी यांना लागली नाही. त्यामुळे त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यावरून संशयित आरोपी संतोष रमेश वराडे (रा.भोपाळ, मध्य प्रदेश), तुषारसिंग मलिक व साहिल धडवाल (पूर्ण नाव गाव माहित नाही) यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनी अमोल मोरे करीत आहेत.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.