१५ हजारांची लाच घेणारा विद्युत निरीक्षक जाळ्यात

लायसन नूतनीकरणासाठी १५ हजारांची लाच

0

जळगाव : शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करणाऱ्या कंत्राटदाराकडन लायसन नूतनीकरणासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षक गणेश मांगो सुरळकर (वय ५२, रा. पार्वती नगर) यांना लाचलूचत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार तरुण हा कंत्राटदार असून तो शासनाचे इलेक्ट्रिकचे कामे घेत असून त्यांच्याकडे परवाना देखील आहे. त्यांचे लायसन नुतनीकरणासाठी त्यांनी खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षक गणेश मांगो सुरळकर यांच्याकडे अर्ज केला होता.

लायसन नूतनीकरणासाठी अधिकाऱ्याने त्यांच्याकडे १५ हजारांची लाच मागितली होती. दरम्यान, तक्रारदाराने याबाबतची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.

कंत्राटदाराकडून वर्ग १ मधील अधिकारी विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर यांच्यावर लाचखोरीची कारवाई झाल्यामुळे एकच खळबळ माजून गेली आहे. याप्रकरणी गणेश सुरळकर यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.