अमित शाह 5 मार्चला जळगाव शहरात दाखल होणार

0

लोकशाही न्युज नेटवर्क

अगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणीला वेग आला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 5 मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. 15 फेब्रुवारी रोजी अमित शाह दौऱ्यावर येणार होते मात्र, हा दौरा स्थगित करण्यात आला होता. आता 5 मार्च रोजी अकोला, जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथे अमित शाह यांची सभा होणार आहे.

जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर दुपारी एक वाजता अमित शाह यांच्या उपस्थितीत युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी देखील अमित शाह यांच्या 5 मार्च रोजी होणाऱ्या दौऱ्याला दुजोरा दिलेला आहे.

भाजपकडून आगामी लोकसेवा निवडणुकीसाठी क्लस्टर ही संकल्पना राबवली आहे. एका क्लस्टरमध्ये चार लोकसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. जळगाव क्लस्टर मध्ये जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.