कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीवर खडसे समर्थक पॅनलचा झेंडा

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा धुराळा उडत आहे. त्यातच मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे समर्थक पॅनलने आपला विजयी झेंडा रोवला आहे.

यात निवडणूकीत १७ पैकी १३ जागांवर राष्ट्रवादी व काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहे. सरपंच पदासाठी खडसे समर्थक डॉ. बी.सी. महाजन हे मोठ्या मतांनी सरपंचपदी निवडून आले आहे. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपा शिंदे गटाचे भागवत राठोड यांचा पराभव झाला आहे. तर उचंदे ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. एकनाथ खडसेंनी त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपा आणि शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.