“बाल मधुमेह दत्तक” योजनेतंर्गत मोफत उपचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या मधुमेह हा गंभीर आजार प्रत्येक घरात पोहचला असून मधुमेह हा वयस्कांसह लहान मुलांनादेखील होत आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर हे मधुमेहग्रस्त लहान मुलांवर मोफत उपचार करून मधुमेह मुक्त भारत बनवण्याची त्यांची संकल्पना आहे. यात अनुयश आरोग्य प्रतिष्ठान संचालित बाल मधुमेह दत्तक योजना ते राबवित आहेत.

या योजनेत वयाच्या 18 व्या वर्षापर्यँत बाल मधुमेहींवर उपचार करून त्यांना घरपोच मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात येणार आहे. यासह मोफत वैद्यकीय सल्ला देखील दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान पुणे, स्वास्थ प्रचारक, समन्वयक दुर्गेश निंबाळकर (मोबाईल नंबर 9405137716) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच बाल मधुमेहींनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.