…म्हणून 83 वर्षांच्या बापाला फिरावे लागते !

चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर टीकेची झोड उठवली

0

रायगड, लोकशाही न्युज नेटवर्क 

चार जूनला निकाल लागल्यानंतर बारामतीमधील विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आम्ही रायगडचा गुलाल उधळायला येणार आहोत, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. तसेच, त्यांनी उद्धव ठाकरे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही समाचार घेतला आहे.

स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही म्हणून 83 वर्षाच्या बापाला फिरून लेकीसाठी मते मागावी लागतात, अशा शब्दात चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंना सुनावले आहे.
रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी आयोजित रायगड जिल्ह्यातील सभेत रूपाली चाकणकर बोलत होत्या. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आदिती तटकरे आधी पदाधिकारी उपस्थित होते. बारामती मतदारसंघांमध्ये लेक प्रचाराला फिरते जिथे वेळ मिळेल तिथे सांगते ‘दमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी, लेकीसाठी बाप बुलंद कहाणी’, मला वाटते आता हे बदलले पाहिजे. पंधरा वर्ष सत्ता दिली, पण स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही म्हणून 83 वर्षाच्या बापाला फिरून त्यांना मते मागावी लागतात. टीका करताना नेहमी भान असले पाहिजे याचे भान या विकत आणलेल्या लोकांना असले पाहिजे.

गाडी-माडीपर्यंत ठीक होते, चारचाकी लांबलचक गाड्या सगळ्यांच्या असतात. पण, ज्यांच्या समोर ही भाषणे झाली त्यांची कोणाची घरे कौलारू आहेत. पण, बायकोच्या सिल्क साडीपर्यंत कोण जात असेल तर मग आम्ही गप्प बसू का? असाही इशारा चाकणकर यांनी यावेळी सुषमा अंधारेंना दिला. दुर्दैवाने देवाने त्यांना रूप उंची नसेल दिली, म्हणून मनामध्ये एक न्यूनगंड असतो की आपल्याला देवाने काहीच दिले नाही, पण मन तरी साफ असावे. पण, दुर्दैवाने ते मनही साफ नाही, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावरती टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.