आ. किशोर पाटलांच्या हस्ते अपघातातील मयताच्या कुटुंबास दोन लाखाचा धनादेश सुपूर्द

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

खडकी ता. चाळीसगाव येथील संदीप राजेंद्र सूर्यवंशी यांचा मोटर सायकल चालवत असताना ताबा सुटल्याने पाचोरा तालुक्यातील सांगवी गावाजवळील दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने मोटरसायकल घसरली त्यावेळेस कुऱ्हाडच्या दिशेने जाणाऱ्या डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने संदीप सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला होता, व त्यांच्यासोबत मोटरसायकलवर त्यांची पत्नी गायत्री सुर्यवंशी ह्या जखमी झाल्या होत्या. संदीपची घरची परिस्थिती हालाखीची असल्याने तसेच त्यांच्या कुटुंबात कर्ता पुरुष नसल्याने त्यांचे पश्चात आई व पत्नी असा परिवार आहे.

या घटनेची माहिती पाचोरा मतदार संघाचे आ.किशोर पाटील यांना मिळाल्यानंतर लागलीच त्यांनी डंपर मालक रोशन पाटील यांना बोलवून मयताच्या कुटुंबाविषयी माहिती दिली, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार मिळावा म्हणून प्रयत्न केले. व किशोर पाटील यांनी डंपर मालक रोशन पाटील यांच्याकडून दोन लाखाचा धनादेश मृताच्या वारसास मिळवून दिला, तसेच लवकरात लवकर विमा कंपनीकडून रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन देखील यावेळी किशोर पाटील यांनी दिले मयताचे नातेवाईकांना दिले. मयत संदिप सुर्यवंशी यांचे नातेवाईक प्राध्यापक राजेश मांडोळे यांना दोन लाखाचा धनादेश आ. किशोर पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी पाचोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय गोहील, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, यावेळी मयताचे नातेवाईक राजेश मांडोळे यांनी आमदार किशोर पाटील व डम्पर मालक रोशन पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.