रायसोनी महाविद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “इनोव्हेशन डे” साजरा

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “इनोव्हेशन डे” साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण भारतात “इनोव्हेशन डे” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जी. एच.  रायसोनी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी प्रियल सोनवणे, प्राची न्यायसे, भूमिका जाधवांनी या विद्यार्थ्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती सांगितली. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या जीवनचरित्रावर आधारित माहितीपट दाखविण्यात येवून मॉडेल मेकिंग व टेक्निकल क़्विज या स्पर्धा घेण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे नियोजन अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, मॅकेनिकल विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, कॉम्प्यूटर विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील, प्रा. स्वाती बाविस्कर यांनी सहकार्य केले. तर सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.