ठरलं तर, शिंदे गटाचा दसरा मेळावा आता या ऐतिहासिक स्थळी होणार…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दसरा मेळाव्या बाबत मेळाव्याच्या आयोजन मैदानावरुन सुरू असलेला शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामधील वाद अखेर संपला असून शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचे ठिकाणही ठरले आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये दसरा मेळाव्याच्या मैदानावरुन वाद सुरू होता. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदानावर दावा करण्यात आला होता. मात्र पालिकेने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर सभा घेण्यास परवानगी दिली. शिंदे गटाकडून दसरा मेळावासाठी क्रॉस मैदान व आझाद मैदानांचे पर्याय ठेवण्यात आले होते. अखेर हा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवरुन उद्धव ठाकरेंची धगधगती मशाल तर आझाद मैदानावर एकनाथ शिंदेचे बाण सुटणार असल्याचे अखेर निश्चित झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.