खडकपूर्णा धरणाचे लघुपाटबंधारे कोरडेठाण…

0

 

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

खडकफोडी पाऊस न झाल्यामुळे जलस्त्रोतात मोठया प्रमाणात घट होत असून जिल्ह्यातील लघुपाटबंधारे कोरडी झाली असून याची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागणार आहे. तर बाष्पीभवनाने रोज एक सेंटीमीटर पाणी कमी होत आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील संत चोखा जलाशय हा मृतसाठ्याकडे सरकत असून सध्याची परिस्थिती १६.६३ तर मृतसाठा हा १६.४० वर आहे सदर धरणात आवक औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील कन्नड येथील पर्वतरांगा येथून उगमस्थान आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातील धाड, करडी, देवपूर चिखला येथील पर्वतरांगा मधून सुद्धा पाणीसाठा होतो जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद या तालुक्यातुन सुद्धा पाणीसाठा होतो. मात्र कुठेच आशादायक पाऊस नसल्याने बिकट परिस्थिती तयार होणार असे धरण व्यवस्थापक भागीले यांनी दैनिक लोकशाही सोबत बोलताना सांगितले.

लघुपाटबंधारे चे बुलडाणा उपविभागीय अधिकारी गवळी यांनी केलेल्या संपर्कादरम्यान जिल्ह्यातील लघुपाटबंधारे चे धरण तळ सुद्धा झाकू शकले नाही कोरडेठाण प्रकल्प पडले आहे.

देऊळगाव राजा नगरपालिकेची पाणीपुरवठा करणारी योजना ही इंटेक वेल उघडी पडली, असून जॉक्वेल ही पाण्यात असून मे२०२४ पर्यंत पाणी कमी पडणार नाही, असे लोकशाही ने केलेल्या संपर्कादरम्यान मुख्यधिकारी तथा प्रशासक अरुनजी मोकळ यांनी सांगितले. गरज पडल्यास शहराच्या पाणी पुरवठ्या साठी सर्व पर्याय खुले ठेवले आहे. माझ्या शहराला पाण्याची टंचाई भासू देणार नाही असा विश्वास शुद्ध बोलून दाखवला.

Leave A Reply

Your email address will not be published.