गृहमंत्री अमित शहांच्या युवा संवाद सभेत युवकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे – डॉ केतकी पाटील

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

देशाचे गृह मंत्री अमित शहा यांचा जळगाव जिल्हा दौरा ५ रोजी नियोजित केलेला असून या मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून उद्या दु.1.00 वाजता सागर पार्क जळगाव येथे युवकांशी संवाद साधणार आहे.

या भव्य युवा संवाद सभेला उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी व युवा नवमतदार युवक-युवती उपस्थित राहणार आहे.

भारत तरुणांचा देश आहे. स्टार्ट अप आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. केंद्र सरकार युवकांसाठी ध्येय धोरणे आखत असते. केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांचे मार्गदर्शन युवकांसाठी प्रेरणादायी स्त्रोत आहे.

या भव्य दिव्य युवा संवाद सभेसाठी जिल्हातील सर्व युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे  असे आवाहन भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.