भाजपचा बालेकिल्ला ढासळला ; रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय

0

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क

कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून तीस वर्षांच्या बालेकिल्ला ढासळला आहे. . भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावत कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे.

भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला आहे. चुरशीची अशी ही लढत पाहिला मिळाली होती. मात्र काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी ११०४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे दिसून आले होते. पाचव्या फेरीनंतर हेमंत रासने रवींद्र धंगेकर यांच्याशी चुरस करताना दिसून आले मात्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा विजयी आघाडी घेतली आणि दणदणीत विजय मिळवला.

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. ‘कसब्यातून रासने आणि धंगेकर याच्यात चुरशीची लढत झाली. या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर पुण्यात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. जनतेमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा दिवस पहायला मिळाल्याची प्रतिक्रीया त्यांनी विजया नंतर दिली. मी उमेदवार म्हणून कमी पडलो अशी प्रतिक्रिया हेमंत रासने यांनी पराभवानंतर दिली.

रवींद्र धंगेकर यांचा परिचय

२००९ मध्ये भाजपच्या गिरीश बापट यांना ५४ हजार ९८२ तर धंगेकर हे तेव्हा मनसेत असूनही त्यांना ४६ हजार ८२० इतकी मतं मिळाली होती.

२०१४ मध्ये काँग्रेसने गिरीश बापट यांच्या विरोधात रोहित टिळक यांना उभे केले होती मात्र याच निवडणुकीत रवींद्र धंगेकर हे मनसे मध्येच होते आणि त्यावेळी त्यांना २५ हजार ९९८ मतं मिळाली होती.

शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले रविंद्र धंगेकर यांनी जानेवारी २०१७ मध्ये मुंबईत काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या काळात कसब्यामध्ये अनेक विकासकामे केली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.