प्रसिद्ध नृत्यांगना आणि सुरदर्शनच्या निवेदिका “शीबा श्यामाप्रसाद” यांचे निधन

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध नृत्यांगना आणि दूरदर्शनच्या निवेदिका शीबा श्यामाप्रसाद (Sheeba Shyamaprasad) यांचे मंगळवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. शिबा कॅन्सरमुळे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि मुले विष्णू आणि शिवकामी असा परिवार आहे.शिबा यांचे पती श्यामाप्रसाद हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक होते. मंगळवार रात्री साडेदहा वाजता किम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिबा यांना झालेल्या कॅन्सरवर उपचार सुरू होते.

शिबा यांनी सुरुवातीच्या काळात त्यांनी दूरदर्शनवर निवेदिका म्हणून काम केलंय. याशिवाय त्या SBI बँकेच्या अधिकारी होत्या. दूरदर्शनवर त्यांनी सुरुवातीला उद्घोषक आणि आशय निर्मात्या म्हणून काम केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.