सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, अदानींना दणका; वाचा सविस्तर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमेरिकेतील फर्म हिंडनबर्गने नुकताच गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपबाबतचा एक रिपोर्ट जाहीर केला होता. या रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपकडून मार्केटमध्ये हेराफेरी करणअयात आल्याचा आणि अकाऊंटमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. हा अहवाल आल्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर प्रचंड प्रमाणात कोसळले. मात्र, अदानी यांच्या या कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावत हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं. हा रिपोर्ट दिशाभूल करणारा असल्याचंही कंपनीने म्हटलं होतं. त्याच सार्सार्भात मोठी बातमी समोर येत आहे.

अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात (Adani Hindenburg Cases) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, (DY Chandrachud) न्यायाधीश पीएस नरसिम्हा (PS Narasimha) आणि जेबी पार्डीवाला (JB Pardiwala) यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी चौकशी करण्याची गरज आहे, असं सांगत कोर्टाने ही सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. इतकेच नव्हे तर सेबीचीही या प्रकरणाची चौकशी सुरूच राहणार आहे. या समितीला दोन महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.