तर मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन !

कंगना रणौतचे राहुल गांधींना आव्हान

0

शिमला, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशच्या मंडीतील भाजपा उमेदवारीचे तिकीट दिले आहे. त्यामुळे कंगना रणौत चांगलीच चर्चेत आली आहे. कंगनाला तिकीट मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. मात्र त्यावरुन मोठा गहजब झाल्यानंतर त्यांनी ती डिलिट केली. आता कंगनाने हिमाचलमधल्या मनालीमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत राहुल गांधींना पप्पू म्हणत आव्हान दिले आहे.

काँग्रेसचा विचार हा महिलांविरोधी आहे. नवरात्र उत्सव सुरु असतानाही त्यांचा महिला विरोधी विचार समोर येतो आहे. मला जेव्हापासून तिकिट मिळाले आहे या काँग्रेसच्या लोकांना मिरची लागली आहे. माझा अपमान केला जातो आहे, मला कलंकित केले जात आहे. असे कंगनाने प्रचार सभेत सांगितले. तसेच पुढे एक मोठा पप्पू दिल्लीत बसला आहे, आपल्याकडे एक छोटा पप्पू आहे. तो म्हणे मी गोमांस खाते, त्याच्याकडे व्हिडीओ आहे. त्याने व्हिडीओ दाखवावा, त्याच्याकडे पुरावा असेल तर त्याने तो सादर करावा. पण ते तो करणार नाही कारण तो छोटा पप्पू खोटारडा आहे, असेही कंगनाने म्हटले. दिल्लीतील मोठा प्पपू म्हणजेच राहुल गांधी यांना शक्तिचा विनाश करायचा आहे असे म्हणतात. त्यामुळे या काँग्रेसच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार?  असा प्रश्न कंगनाने विचारला आहे.

मला अपवित्र, कलंकित का ठरवले जाते ?

माझ्यावर टीका केली जाते की मी अपवित्र आहे. मी देवभूमीत जायला पाहिजे. मला का अपवित्र, कलंकित ठरवले जाते आहे. माझा महिला भगिनींना सवाल आहे या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांनी आपले स्थान निर्माण करायचे नाही का? केंद्रात किती महिला मंत्री आहेत? राज्यांमध्ये किती महिला मंत्री आहेत? आपल्या मुलींचे भविष्य आहे का? तुमच्या मनालीची मुलगी म्हणजे मी स्वतःचे अस्तित्व शोधते आहे तर यांना मिरची का लागते? एकीकडे या प्रकारची घाणेरडी विचारधारा असलेले पुरुष आहेत. दुसरीकडे आपल्या सगळ्यांचे लाडके नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी महिलांनी राजकारणात यावे म्हणून 33 टक्के आरक्षण दिले आहे. असे कंगनाने म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.