शिंदाड, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे विजा व वाऱ्यासह पाऊस पडला. शिंदाड येथील शेतकरी मधुकर पाटील यांची गाय शेतामध्ये निंबाच्या झाडाला बांधलेली असतांना सायंकाळी वीज वाऱ्याचा अवकाळी पावसाने वीज पडून मधुकर पाटील या शेतकऱ्याच्या गाईचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
पाऊस चालू असताना मधुकर पाटील हे संध्याकाळी घरी आले व दुसऱ्या दिवशी सकाळी ते शेतात चक्कर मारायला गेले असता गाय मृत्युमुखी अवस्थेत पडलेली दिसली. त्यावेळेस शेतकऱ्याने हंबरडा फोडला व अश्रूंना बांध फुटला. दरम्यान शेतकरी मधुकर पाटील यांनी पशुवैद्यकीय अधिकारी व कृषी अधिकारी, तलाठी यांना तात्काळ फोन करून बोलून घेतले व त्यांना परिस्थिती सांगितले. त्यांनी यावेळी पंचनामा केला.
आधीच दुष्काळ ग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. त्यात आता जवळपास एक लाख रुपयाचे मोठे नुकसान झाले. तरी या शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावातील शेतकरी वर्गाने केली आहे.