जळगावात जामनेरच्या महिलेची दागिने आणि रोकड चोरली !

0

जळगाव ;- जामनेर येथी रहिवाशी महिला जळगावात आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळील ४८ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि २५ हजार रोख असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २४ जून रोजी सकाळी सव्वा अकरा ते १२ :३० वाजेच्या सुमारास घडली .

 

याप्रकरणी जामनेरातील योगिता जगदीश कापडे वय ३२ रा, सम्राट अशोक नगर ता. जामनेर यांनी तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध सुरुवातीला जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्ह्याचे ठिकाण जळगाव असल्याने हा गुन्हा जळगाव शहर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आल्याने शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना प्रफुल्ल धांडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.