भंगाराच्या व्यवसाय करू देणार नाही असे सांगून दोघांकडून बळजबरी पैसे हिसकावले

0

जळगाव ;- शहरातील गेंदालाल मिल परिसरात भंगाराच्या व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकी देऊन दोघांकडून बळजबरीने मारहाण करून १७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना २६ रोजी रात्री ५ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली महिती अशी कि, फिर्यादी असलम खान रा. लक्ष्मी नगर हे भंगार व्यवस्याय करीत असून त्यांचे मित्र यासिन शेख नईम हेदेखील भंगार व्यवसाय करतात. २६ जून रोजी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास आरोपी मुसईफ शेख अकील रा. गेंदालाल मिल याने दोघांकडे भंगार व्यवसाय करण्यासाठी मला पैसे द्यावे लागतील अन्यथा धंद्दा करू देणार नाही अशी धमकी देऊन दोघांना मारहाण करून फिर्यादीच्या खिशातून रोख १२०० रुपये आणि त्याचा मित्र यासिन याच्या खिशातून ५०० रुपये हिसकावले . याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असूनतपास पोहेकॉ भास्कर ठाकरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.