धक्कादायक: दिवसाढवळ्या पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

दर्शन पवार हत्याप्रकरण (Darshan Pawar murder case) ताजे असतांनाच पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण सदाशिव पेठ (Sadashiv Peth) येथे दिवसाढवळ्या एका तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केला. पादचाऱ्यांमुळे आज ती तरुणी वाचली नाही तर, तिचाही दर्शना पवार झाला असता. हल्ल्यात तरुणीच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर तरुणीने आपली आपबिती माध्यमांसमोर मांडली.

काय म्हणाली तरुणी?

हल्ला करणारा व्यक्ती माझ्या परिचयचाच होता. माझा काही दोष नसतांना त्यानं मला मारले, कॉलेज जवळ येऊन धमक्या दिल्या. मी त्याच्याशी बोलणं बंद केलं, तर फोन करून सतत धमक्या देत असे. माझा पाठलाग करायचा. त्याच्या घरच्यांना सांगितले पण त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केले. आणि त्याच्या घरच्यांना सांगितले म्हणून आज तो कोयता घेऊन माझ्यावर वार करायला आला.

काय आहे प्रकरण

तरुणी कॉलेजला जात असतांना. त्यावेळी तो आला माझ्याशी पाच मिनीटं बोलं म्हणत म्हंटला. मी नाही म्हटलं. तिथं थांबले नाही. याच गोष्टीचा राग अनावर होत त्याने तरुणीवर वार केला. तरुणीच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. वेळीच मुलीच्या सोबत असणाऱ्या मित्राने त्याला अडवले नसते तर आज या तरुणीचा सुद्धा दर्शना पवार झाल्याशिवाय राहिला नसता.

Leave A Reply

Your email address will not be published.