शनिपेठेतून ५ बकऱ्या चोरल्या ; गुन्हा दाखल

0

जळगाव ;- शहरातील शनिपेठ परिसरातून सुमारे ३५ हजार रुपयांचे बकऱ्या अज्ञात व्यक्तीने ओमनि वाहनातून चोरून नेल्याची घटना २२ जून २०२३ रोजी सकाळी साडे नऊ ते साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, भोला प्रकाश सपकाळे वय ३२ हे जुना आसोदा रोडवरील धनकर नगर येथे राहत असून मजुरी करतात . त्यांनी आपल्या ५ बकर्या चारण्यासाठी सोडल्या असता राखाडी रंगाच्या ओमनी वाहनातील चालकाने त्या बकर्या वाहनात कोंबून पसार झाला . याबाबत भोला प्रकाश सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना अमोल विसपुते करीत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.