मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याआधीच पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात

0

जळगाव ;- राज्यात कापूस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यावर सरकारने कोणताही तोडगा काढलेला नाही. जिल्ह्यातील मंजूर प्रकल्प अन्यत्र पळविले जाणे, भीषण टंचाई, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या सर्व प्रश्‍नांवर कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना मंगळवारी (ता. २७) काळे झेंडे दाखविण्यावर असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले होते.

मात्र या कार्यक्रमात आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस जळगावात पोहचण्यापूर्वीच  राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळे झेंडे दाखवण्याचा इशाऱ्याच्या पार्श्वभूमिवर ही कारवाई करण्यात आली आहे. यात माजी आमदार रोहिणी खडसे यांच्यासह जिल्हा, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण वातावरण चांगलेच तापले आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम सध्या हाती घेण्यात आला आहे. त्यातील जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान शासन आपल्या दारी या कर्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी विमानतळावर आगमन झाले . यावेळी त्यांच्यासमवेत ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.